शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 21:29 IST

Kangana Ranaut : कंगना राणौत विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई - आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांच्यामार्फत कंगना राणौतविरोधातपोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात कंगनाच्या नुकत्याच केलेल्या 'भिक म्हणून स्वातंत्र्य मिळाले' या विधानावर कारवाई करण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे महासचिव भरत सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.कंगना राणौत विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने जगभरात प्रसारित झालेल्या मुलाखतींद्वारे बेजबाबदार विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय नागरिक, महान माजी स्वातंत्र्यसैनिक, नायक आणि माजी नेत्यांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का बसला आहे. हे राष्ट्रीय प्रतिष्ठेच्याविरुद्ध आणि घटनाविरोधी असल्याचे वर्णन केले आहे. या विधानाची तुलना देशात दंगली आणि दहशतीच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्याशी करण्यात आली आहे.कंगना राणौत स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सतत वादात सापडली आहे. कंगनाने एका वक्तव्यात म्हटले होते की, 2014 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, ज्यावरून बराच वादंग पेटला होता. एवढेच नाही तर महात्मा गांधींबद्दल म्हणाली होती  की, दोन्ही गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही. या विधानावरून मोठा गदारोळही झाला होता.

यानंतर मुंबई पोलिसांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना राणौतवर गुन्हा दाखल केला आहे. शीख समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि आयपीसीच्या कलम 295(अ) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये कंगनाच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMumbaiमुंबईPoliceपोलिसcongressकाँग्रेस