शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळला; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 22:00 IST

निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्दे या रॅम्प कोसळला तेव्हा निहाल त्याखाली चिरडला आणि गंभीर जखमी  झाला. नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात हलविले. 'निहालला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरने त्याला तपासले आणि मयत घोषित केले

मुंबई - गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे  सर्वत्र खळबळ उडाली आहे. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतले आहे.निहाल वासवानी (६) असे मयत मुलाचे नाव आहे. कांदिवली पश्चिमच्या महावीरनगरमध्ये  वीणासंतूर इमारत आहे. या इमारतीमध्ये बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत हायड्रोक्लोरीक पार्किंग आहे. एक कार धुवून झाल्यानंतर इमारतीचा सुरक्षारक्षक ती गाडी हायड्रोक्लोरिक रॅम्पवरून चढवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तितक्यात तो रॅम्पच खाली कोसळला. त्यावेळी सोसायटीमधील काही मुले त्याठिकाणी खेळत होती. त्यात निहालचा देखील समावेश होता. या रॅम्प कोसळला तेव्हा निहाल त्याखाली चिरडला आणि गंभीर जखमी  झाला. त्याला नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात हलविले. 'निहालला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरने त्याला तपासले आणि मयत घोषित केले', अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली. निहालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करत सध्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हायड्रोलीक रॅम्प नेमका कशामुळे खाली कोसळला याबाबत चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. निहालच्या मृत्युमुळे अख्खी सोसायटी हळहळली असुन त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी