अफेअर पकडल्याने पत्नीला कारखाली चिरडणाऱ्या कमल मिश्राला अटक 

By गौरी टेंबकर | Updated: October 28, 2022 12:06 IST2022-10-28T12:05:32+5:302022-10-28T12:06:18+5:30

मिश्राची पत्नी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसल्याचे तिने पाहिले. तिच्यासोबत रोमॅन्टिक झाला होता.

Kamal Mishra was arrested for crushing his wife under the car after Caught affaire | अफेअर पकडल्याने पत्नीला कारखाली चिरडणाऱ्या कमल मिश्राला अटक 

अफेअर पकडल्याने पत्नीला कारखाली चिरडणाऱ्या कमल मिश्राला अटक 

मुंबई: पत्नीला कारखाली चीरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला होता. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बॉलिवूड चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांनतर गुरुवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यांना शुक्रवारी सकाळी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

१९ ऑक्टोबरची ही घटना आहे. मिश्राची पत्नी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसल्याचे तिने पाहिले. तिच्यासोबत रोमॅन्टिक झाला होता. दोघांना सोबत पाहून मी कारच्या काचेवर टकटक केले आणि काच खाली करण्यात सांगितले. परंतू, कमलकिशोरने कार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मी त्याची कार थांबविण्यासाठी पुढे आले तर त्याने कार माझ्यावरून घातली. यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, असे मिश्राच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.  

मिश्राने भूतियापा, फ्लॅट नंबर 420, शर्मा जी की लग गई, देहाती डिस्को, खली बली यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2019 मध्ये त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले.

Web Title: Kamal Mishra was arrested for crushing his wife under the car after Caught affaire

टॅग्स :Policeपोलिस