Kalyan Bird Shop Fire: भयाण बुधवार! प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने ओरडत होते; दुकानांना लागलेल्या आगीत अनेक मासेदेखील मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:22 PM2022-01-12T12:22:03+5:302022-01-12T12:22:14+5:30

Kalyan Bird Shop Fire: कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर ही पक्षी, ससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून 3 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डस, कबुतरे, ससे आणि माशांची विक्री केली जायची.

Kalyan Bird Shop Fire: Animals, birds were screaming for help; Many fish were also killed in the shop fire | Kalyan Bird Shop Fire: भयाण बुधवार! प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने ओरडत होते; दुकानांना लागलेल्या आगीत अनेक मासेदेखील मृत्युमुखी

Kalyan Bird Shop Fire: भयाण बुधवार! प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने ओरडत होते; दुकानांना लागलेल्या आगीत अनेक मासेदेखील मृत्युमुखी

Next

कल्याण : आजची सकाळ कल्याणकरांसाठी काहीशी हृदयद्रावक ठरली. कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात दुकानांना लागलेल्या आगीमध्ये अनेक पक्षी, प्राणी आणि माशांचा मृत्यू झाला आहे. विविध पक्षी, प्राणी आणि माशांच्या विक्रीची ही दुकाने होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र, आगीवेळी पक्षांची जिवाच्याआकांताने घातलेली ओरड परिसरात बराच वेळ घुमत होती. 

कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर ही पक्षी, ससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून 3 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डस, कबुतरे, ससे आणि माशांची विक्री केली जायची. आज सकाळी 8. 30 वाजण्याच्या सुमारास या दुकानाना आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षी, ससे आणि माशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला.

तर घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. आणि त्यातही काही पक्षी, ससे माशांना जीवदान दिले. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ठोस कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Kalyan Bird Shop Fire: Animals, birds were screaming for help; Many fish were also killed in the shop fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग