शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 21:23 IST

बिबवेवाडी येथील ३१ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे

ठळक मुद्दे लाचेची रक्कम खाण्याचा प्रयत्न

पुणे : दोषारोपपत्राच्या छायांकित प्रती देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडले़. प्रसन्नकुमार गणपतराव भागवत (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. आपल्यावर कारवाई होत असल्याचे दिसताच भागवत याने लाचेची रक्कम तोंडात टाकून त्या चावण्याचा प्रयत्न केला़. पण, पोलिसांनी त्या तातडीने ताब्यात घेतल्या़. गेल्या दीड वर्षात शिवाजीनगर न्यायालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही तिसरी कारवाई आहे़. त्यामुळे न्यायालयातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे.  याबाबत बिबवेवाडी येथील ३१ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे.  तक्रारदारांच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याची प्रत देण्यासाठी तक्रारदारांना लाच मागण्यात आली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयातील ५ क्रमांकच्या न्यायालयाच्या परिसरात सापळा रचला़ तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारताना भागवत याला पकडण्यात आले़ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचार