Dehradun Crime:उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये एका स्वतंत्र पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंकज मिश्रा असे मृत पत्रकाराचे नाव असून, त्यांच्याच ओळखीच्या काही व्यक्तींनी घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री राजपूर भागात घडली. मुख्य आरोपी एका डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार म्हणून काम करतो, तो आपल्या काही साथीदारांसह पंकज मिश्रा यांच्या घरात शिरला. जुन्या वादातून आणि सोशल मीडियावरील शाब्दिक चकमकीतून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हृदयविकाराचा रुग्ण आहे, छातीवरच मारा
मिश्रा यांचे भाऊ अरविंद यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत हल्लेखोरांच्या क्रूरता सांगितली. रात्री १० च्या सुमारास मुख्य आरोपी आणि त्याच्या टोळीने घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हल्लेखोरांपैकी एकाने ओरडून सांगितले की, "पंकजला हृदय आणि यकृताचा त्रास आहे, याच्या थेट छातीवर आणि पोटावरच मारा." मुख्य आरोपीने पंकज यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा-बुक्क्यांनी प्रहार केले. एवढं याला संपवण्यासाठी पुरेसं आहे असे म्हणत त्यांनी मारहाण सुरूच ठेवली, ज्यामुळे पंकज यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले.
रात्री प्रकृती बिघडली अन् घात झाला...
आरोपींनी पळून जाताना पंकज आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल फोनही नेला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या पंकज यांनी घाबरलेल्या अवस्थेत सकाळी तक्रार देतो असे पोलिसांना सांगितले. मात्र, मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली. ते बेडवरून उठले आणि अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या मागणीनुसार दुसऱ्यांदा शवविच्छेदन केले जाणार आहे. राजपूर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ३०४, ३३३ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीसह त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Web Summary : Dehradun journalist Pankaj Mishra was murdered after a social media argument. Attackers, known to Mishra, assaulted him at home, targeting his chest due to a heart condition. Police are investigating; suspects are at large.
Web Summary : देहरादून में सोशल मीडिया विवाद के बाद पत्रकार पंकज मिश्रा की हत्या कर दी गई। मिश्रा के परिचित हमलावरों ने घर में घुसकर उन पर हमला किया, हृदय की स्थिति के कारण उनकी छाती को निशाना बनाया। पुलिस जांच कर रही है; संदिग्ध फरार हैं।