शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारावर हल्ला, पाच जणांना अटक; सूत्रधाराचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 20:54 IST

Attack on Journalist :सूत्रधार गौरव शर्माचा पोलिस शोध घेत आहेत. शर्माच्या अटकेनंतर हल्ल्यामागचे कारण समोर येणार आहे.

डोंबिवली: पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर गुरूवारी झालेल्या हल्लाप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या हल्ल्याचा सूत्रधार गौरव शर्माचा पोलिस शोध घेत आहेत. शर्माच्या अटकेनंतर हल्ल्यामागचे कारण समोर येणार आहे.

कांदू यांचे पुर्वेकडील नामदेव पथ परिसरात आरती स्वीट मार्ट नामक दुकान आहे. गुरूवारी दुपारी ते दुकानात बसले असताना एक तरु णी त्यांच्या दुकानात आली. आणि तीने काही वस्तू खरेदी केल्या. दुकानाबाहेर पडल्यावर तीने रिक्षातील तीन जणांना कांदू यांच्या दिशेने इशारा केला. त्यांनी दुकानात घूसून कांदू यांना मारहाण केली त्यानंतर ते निघून गेले. या प्रकरणी कांदू यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस सुद्धा करीत होते.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर, नवनाथ कवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरग, विश्वास माने, बालाजी शिंदे, गोरक्ष शेकडे, बापू जाधव, महेश साबळे, बेलदार, महीला पोलीस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी ज्या रिक्षातून पळून गेले होते ती रिक्षा शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर , अमोल सावंत यासह ऐका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तर किर्ती अमोलकर हिला रविवारी अटक केली. अटक आरोपींनी गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने कांदू यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते अशी कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. शर्माने  कोणाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केले आहे का या मागे काही राजकीय षडयंत्र किंवा भूमाफियांचा हात आहे का याचा खुलासा शर्माच्याअटकेनंतर होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdombivaliडोंबिवली