शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Jitendra Awhad : धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाणीत तीन पोलिसांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:22 IST

Jitendra Awhad News : पोलिसांच्या प्राथमिक तपासातील माहिती

ठळक मुद्देठाण्यातील भाजप आमदारांनी केली सखोल चौकशीची मागणी, पोलीस आयुक्तांना दिले पत्रसखोल चौकशी करण्याची मागणी ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठाणे -  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

 

घोडबंदर रोडवरील कावेसर भागात राहणारया अनंत करमुसे या अभियंत्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा जाब विचारत पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 6 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. ही काठी तुटेपर्यंत आधी मारहाण झाली. त्यानंतर त्यांनी माफी मागितल्यानंतरही तिथे उपस्थित असलेल्यांनी मारहाण केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदार करमुसे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. बुधवारी दिवसभर यातील संबंधित अनेकांची त्यांनी चौकशी केली. 

यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुरक्षा विभागातील तीन पोलीस कर्मचारयांचा तसेच काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारयाने सांगितले. तसे असेल तर ते कोण पोलीस कर्मचारी आहेत? याची चौकशी केली जाणार आहे. अर्थात, वर्तकनगर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृरित्या आपली प्रतिक्रीया व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली आहे. 

दरम्यान, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना घरातून मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले होते. आव्हाडांच्या उपस्थितीतच त्यांना अमानुष मारहाण झाली. या प्रकरणात खुद्द मंत्र्याचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी  मागणीही केळकर आणि डावखरे यांनी यपत्रातून पोलीस आयुक्तांना केली आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडFacebookफेसबुकPoliceपोलिसcommissionerआयुक्तNiranjan Davkhareनिरंजन डावखरेthaneठाणे