शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:52 IST

जीजूने आधी मेहुणीसोबत संबंध ठेवले. मेहुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आणि एक भयानक कृत्य केले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका जीजूने आपल्या मेहुणीसोबत सर्व मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जीजूने आधी तिच्यासोबत संबंध ठेवले. मेहुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आणि एक भयानक कृत्य केले. त्याच्या या कृत्यानंतर मेहुणीची तब्येत बिघडू लागली. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यावर तिला वडिलांसोबत तिच्या घरी पाठवण्यात आले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाला. गर्भपातानंतर झालेल्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाला. मझगई पोलिसांना शवविच्छेदन अहवाल आणि तक्रारीची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आरोपी भावजीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मझगई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न फुलबेहड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणासोबत केले होते. त्याची मोठी मुलगी आजारी असल्यामुळे तिची २१ वर्षीय धाकटी बहीण (मृत युवती) आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. या दरम्यान बहिणीच्या नवऱ्याने युवतीला फसवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. जेव्हा त्याला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने तिचा गर्भपात करवून घेतला. गर्भपातानंतर युवती आजारी पडू लागली. जीजूने तिच्यावर उपचारही केले, परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडल्याने ती आपल्या वडिलांच्या घरी परत आली. येथेच १७ जून रोजी तिचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम अहवालात संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पुष्टीगुरुवारी युवतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात युवतीच्या मृत्यूचे कारण संसर्ग (infection) असल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांनी व्हिसेरा देखील जतन केला आहे. पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी शवविच्छेदन अहवालाची पुष्टी केली. एसपींनी सांगितले की, गर्भपात झाल्यामुळे युवतीला संसर्ग झाला होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी जीजू अखिलेश याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू