शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड ८ महिन्यांची गरोदर; काटा काढण्यासाठी बॉयफ्रेंडने रचला पाणीपुरीचा खतरनाक प्लॅन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:31 IST

एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला मारण्याचा भयानक कट रचला होता.

झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रमकंडा पोलीस स्टेशन अंतर्गत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला पाणीपुरीमध्ये विष मिसळून मारण्याचा भयानक कट रचला होता. सुदैवाने तरुणी थोडक्यात वाचली आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिने संपूर्ण रात्र जंगलात लपून काढली. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले होते, मात्र ती आठ महिन्यांची गरोदर राहिल्यावर त्याने तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, साकेत केशरी नावाच्या तरुणाचं गेल्या ६ वर्षांपासून तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. एक वर्षापूर्वी त्यांना एक मुलगाही झाला होता. मात्र गाव आणि समाजाने यात हस्तक्षेप केल्यानंतर त्या दोघांना वेगळं करण्यात आलं होतं आणि त्यांच्या भेटीगाठींवर बंदी घालण्यात आली होती. आरोप असा आहे की, काही महिन्यांनंतर आरोपीने पुन्हा तरुणीशी संपर्क साधला. यानंतर तरुणी पुन्हा गरोदर राहिली. सध्या ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.

विषारी पाणीपुरी देऊन मारण्याचा प्रयत्न

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने तिला फोन करून काहीतरी खायला जाऊ असं सांगितलं. तेव्हा तिने पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या आणि तोंडातून रक्त येऊ लागलं. सायंकाळी चारच्या सुमारास आरोपीने पुन्हा फोन करून तिला डॉक्टरकडे नेतो असं सांगितलं.

तरुणीला बेदम मारहाण

डॉक्टरकडे नेण्याऐवजी तो तिला बाईकवरून एका जंगलात घेऊन गेला. जंगलात १०० मीटर आत नेऊन त्याने तरुणीला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत तरुणीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर ती कशीबशी जंगलात लपली आणि संपूर्ण रात्र तिने तिथेच काढली. 

साकेत केशरी याला अटक 

दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीने घर गाठून कुटुंबीयांना हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून रमकंडा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी साकेत केशरी याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pregnant Girlfriend Poisoned with Pani Puri; Boyfriend Arrested for Attempted Murder

Web Summary : In Jharkhand, a man tried to kill his pregnant girlfriend with poisoned Pani Puri after promising marriage. She survived a brutal attack in a forest. The boyfriend is now arrested.
टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpregnant womanगर्भवती महिला