धनबाद/रांची : न्यायाधीश उत्तम आनंद मृत्युप्रकरणी २४३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, १७ जणांना अटक करण्यात आली आहे, दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, याशिवाय २५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.या घटनेची सीसीटीव्ही दृश्ये सार्वजनिक केल्याने उपनिरीक्षक आदर्श कुमारससह दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी सांगितले. धनबाद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धाडसत्र राबवून २४३ संशयितांना रविवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.मुख्यमंत्री हिंमत सोरेन यांनी न्यायाधीशांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड सरकारनेही विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील ५३ हॉटेलात झाडाझडती घेतली आणि १७ जणांना अटक करण्यात आली, विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. न्यायाधीशांना धडक देणारी रिक्षा जप्त करण्यात आलेली असली, तरी २५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
झारखंड न्यायाधीशांच्या मृत्युप्रकरणी २४३ संशयित ताब्यात, १७ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 10:15 IST