शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याचं क्रूर कृत्य! गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह जाळला, हाडं पेटीत भरुन बायकोकडे पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:31 IST

माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. दोन लग्न झालेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या 'लिव्ह-इन' पार्टनरची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जाळला आणि उरलेली हाडं एका लोखंडी पेटीत भरून आपल्या दुसऱ्या पत्नीच्या घरी पाठवली. लोडर चालकाच्या सतर्कतेमुळे हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रामसिंह याची आधीच दोन लग्न झाली होती. तरीही तो प्रीती नावाच्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रीती सातत्याने रामसिंहकडे पैशांची मागणी करत होती आणि आतापर्यंत तिने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. या त्रासाला कंटाळून रामसिंहने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह एका निळ्या रंगाच्या पेटीत ठेवून जाळला. मृतदेहाची राख त्याने नदीत वाहून दिली, मात्र शिल्लक राहिलेली हाडे आणि कोळसा त्याच पेटीत भरला. त्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या मदतीने ही पेटी एका लोडर गाडीतून आपली दुसरी पत्नी गीता हिच्या घरी पाठवून दिली.

शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झाशी पोलीस नियंत्रण कक्षाला एका लोडर चालकाचा फोन आला. आपल्याला या पेटीबद्दल संशय असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गीता नावाच्या महिलेच्या घरातून ती पेटी जप्त केली. पेटी उघडताच पोलीसही चक्रावून गेले.त्यात मानवी हाडांचे अवशेष आणि कोळसा आढळून आला. फॉरेन्सिक टीमने तपासणी केल्यानंतर ते अवशेष मानवी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

झाशीच्या पोलीस अधीक्षक प्रीती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपी रामसिंहचा मुलगा नितीन याच्यासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्य आरोपी रामसिंह सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोडर चालक जयपाल याने सांगितले की, ४०० रुपयांत गाडी भाड्याने ठरवून ही पेटी वाहून नेण्यात येत होती, मात्र संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Man Kills Live-in Partner, Sends Remains to Wife: Shocking Crime

Web Summary : In Jhansi, a retired railway worker murdered his live-in partner, burned the body, and sent the remains to his wife in a metal box. A suspicious loader driver alerted police, leading to the arrest of two, while the main accused is absconding.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस