लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला

By नामदेव मोरे | Updated: November 26, 2022 15:05 IST2022-11-26T15:04:58+5:302022-11-26T15:05:25+5:30

वाशी रेल्वे स्टेशन समोरील इंम्पिरीयल बॅक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी लग्नसमारंभात चोरी झाली.

Jewels worth two and a half lakhs of the bride were stolen from the wedding ceremony | लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला

लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला

नवी मुंबई :

वाशी रेल्वे स्टेशन समोरील इंम्पिरीयल बॅक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी लग्नसमारंभात चोरी झाली. चोरट्यांनी नवरी मुलीचे अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.

वरळीमध्ये राहणारे प्रणव वसा यांच्या बहिणीचे शुक्रवारी इंम्पिरियल बॅक्वेंट हॉलमध्ये लग्न होते. लग्नामध्ये वरपक्षाकडून नवरी मुलीला अडीच तोळ्याचा नेकलेस, अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याचे झुमके, एक तोळ्याची बिंदी, एक तोळ्याची नथ असे अडीच लाख रुपयाचे दागिने भेट दिले होते. सायंकाळी साडेचार ते नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हे दागिने चोरून नेले आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मध्यरात्री वाशी पोलिस स्टेशनमध्ये तत्काळ चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्न समारंभातूनच दागिने चोरीला गेल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल करून हॉल गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Jewels worth two and a half lakhs of the bride were stolen from the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.