शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून दागिने, रोकड लंपास; चोरटयांच्या हल्ल्यात मायलेकी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 22:03 IST

ROBBERY CASE : याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण - घरफोडी वाहनचोरी आणि रस्त्यावर लुटमारीचे प्रकार सातत्याने घडत असताना येथील अटाळी गावातील एका घरात घुसून दोघा चोरटयांनी वृध्द महिला आणि  तिच्या विवाहित  मुलीवर हल्ला करीत दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री मध्यरात्री घडली. दोघीजणी जखमी झाल्या असून त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अटाळी मानी गावात राहणा-या वत्सला चिकणे यांच्या शेजा-याने माघी गणेशाची स्थापना केली होती. त्यानिमित्ताने वत्सला यांची मुलगी सारिका चव्हाण ही देखील तीच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी आली होती. रविवारी मध्यरात्री वत्सला आणि सारिका व तिची मुले घरात झोपले असताना त्यांच्या घरात दोन चोरटे घुसले. दरम्यान त्याचवेळेला वत्सला यांना जाग आल्याने त्या उठल्या. चोरटे त्यांच्या निदर्शनास पडताच  त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी वत्सला यांच्या डोक्यावर चोरटय़ांनी कोणत्यातरी वस्तूने प्रहार केला.

यावेळी झालेल्या आवाजाने मुलगी सारीका ही देखील जागी झाली. सारीकाने चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांनी तीला ही मारहाण केली. चोरटयांच्या हल्ल्यात दोघी जखमी झाल्या. चोरटयांनी घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पोबारा केला. मायलेकींवर डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु  आहेत. चोरटयांच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरी