शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीत सराफावर गोळीबार करत लुटला लाखोंचा ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:32 IST

रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराज नगर येथे आकाशंगा हाउसिंक सोसायटीजवळ शिवराज गार्डन समोर पुणेकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे.

ठळक मुद्देदुकानातील साहित्याची तोडफोड , महिला जखमी

पिंपरी : सराफावर गोळीबार करत चार चोरट्यांनी सराफी पेढीतून सोन्या-चांदिचे दागिने लुटून नेले. रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराजनगर येथे बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्यविधान अपार्टमेंट, साई कॉलनीजवळ, रहाटणी) असे गोळीबारात जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. तसेच सराफी दुकानातील कामगार मोनाली नवनाथ कंधारे (वय ३८) यांनाही चोरट्यांनी दुखापत केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराज नगर येथे आकाशंगा हाउसिंक सोसायटीजवळ शिवराज गार्डन समोर पुणेकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. दिव्यांक मेहता यांच्या मालकीची ही पेढी आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास दिव्यांक मेहता आणि  कंधारे सराफी पेढीत होते. त्यावेळी चार चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून बंद केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिव्यांक मेहता आणि मोनाली कंधारे गोंधळले. त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. यात चोरट्यांनी दिव्यांक यांच्या उजव्या पायावर गोळी मारली. तसेच मोनाली कंधारे यांनी त्यांच्या फोनवरून फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेत चोरट्यांनी तो फोन फोडला. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले. पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीलगत अनेक दुकाने आहेत. असे असतानाही चोरट्यांनी अचानक लूटमार करीत लाखोंचा ऐवज लुटून नेला. ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी दिव्यांक यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. दिव्यांक यांचे कुटुंबिय आणि काही नागरिकांनी मेहता आणि मोनाली कंधारे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

पुणेकर ज्वेलर्सच्या शाखेतील दुसरा प्रकारदिव्यांक मेहता आणि त्यांचे वडील प्रदीप मेहता यांच्या मालकीच्या पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीच्या दोन शाखा आहेत. मूळ शाखा रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालयासमोर आहे. रहाटणीतील शिवराजनगर येथे सुमारे वर्षभरापूर्वी पुणेकर ज्वेलर्स यांची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. मूळ शाखा असलेल्या रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालयासमोरील पुणेकर ज्वेलर्सच्या दुकानात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी रात्री दुकान फोडून ऐवज लंपास केला होता.

टॅग्स :rahatniरहाटणीCrime Newsगुन्हेगारीThiefचोरjewelleryदागिने