शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:26 IST

Javed Meerpuria Arrested: लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

Javed Meerpuria Arrested: गाझियाबाद : जावेद मीरपुरिया दुबईहून भारतात परतला असून त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. जावेद मीरपुरिया हा देशातील मोबाईल टॉवरचे आरआर युनिट चोरून चीनसह इतर देशांमध्ये विकत होता. गाझियाबाद पोलिसांनी त्याच्यावर १ लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

जावेद हा दिल्लीतील मुस्तफाबादचा रहिवासीदिल्लीतील मुस्तफाबादमधील जावेद मीरपुरिया हा आधी भंगार विक्रेता म्हणून काम करत होता. त्यानंतर त्यानं एक टोळी तयार करून चोऱ्या करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मोबाईल टॉवरचे रेडिओ रिसीव्हर युनिट व इतर उपकरणं चोरण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची तयारी केली. मात्र, तोपर्यंत तो दुबईला गेला आणि तिथून टोळी चालवली.

मोबाइल टॉवर उपकरणे चोरी करण्यासाठी वापरलेया टोळीत त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश होता, गाझियाबाद येथे जावेद मीरपुरियाच्या टोळीतील सदस्यांना मोबाईल टॉवरच्या उपकरणांच्या चोरीच्या प्रकरणात पकडले असता त्याचे नाव समोर आले होते. देशात विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या उपकरणांची चोरीच्या घटनेत त्याचा हात असल्याचेही समोर आले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केली अटक या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी जावेदच्या २० साथीदारांना अटक केली होती. तसंच, जावेद मीरपुरियाला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम राबवली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी रात्री दुबईहून भारतात परतला आणि माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला अटक केली.

दिल्ली पोलिसांनी गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात दिलेदिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर गाझियाबाद पोलीस दिल्ली पोहोचले आणि त्याला ट्रान्झिट रिमांडवर गाझियाबादला नेले. याला दुजोरा देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अब्दुर रहमान सिद्दीकी यांनी सांगितलं की, जावेदविरुद्ध नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी त्याची ट्रान्झिट रिमांडवर चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश