शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जमील शेख हत्या प्रकरण; ओसामाच्या शोधासाठी ठाणे पोलिसांचा यूपीमध्ये मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:47 IST

मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार करून त्यांची हत्या केली होती.

जितेंद्र कालेकर -

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधाराचा अद्यापही शोध सुरूच आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक यातील मुख्य संशयित आरोपी ओसामा याच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात अलीकडेच रवाना झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. याच हत्या प्रकरणातील शाहिद शेख या आरोपीला २५ नोव्हेंबर २०२० रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने भिवंडीतील पडघा येथून अटक केली होती. ज्या मोटारसायकलीवरून तो पळाला होता, ती मोटारसायकल पडघ्यातच मिळाली होती. त्याच भागातील एका गटारात या मोटारसायकलीची नंबर प्लेटही पोलिसांना मिळाली होती. नंतर ठाणे खंडणी विरोधीपथक तसेच युनिट एकच्या पथकाने याच मोटारसायकलीवरून गोळी झाडणारा इरफान शेख (२१) याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वारंवार हुलकावणी देत होता. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलातील (एसटीएफ) पोलीस निरीक्षक सत्यप्रकाश सिंग आणि उपनिरीक्षक सूरज सिंग या पथकाच्या मदतीने ३ एप्रिल २०२१ रोजी इरफान याला ठाण्याच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी अटक केली होती.इरफानला ओसामा याने या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचे एसटीएफच्या चौकशीत समोर आले. याच चौकशीमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचाही उल्लेख एसटीएफने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. त्यामुळे हल्ल्यानंतर पुन्हा राबोडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमीलचे नातेवाईक आणि मनसेने सुरुवातीलाच मुल्ला यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मूळात, हत्येची सुपारी देणारा ओसामा हाती न लागल्यामुळे या हत्येतील मारेकरी आणि सूत्रधार यांच्या साखळीचा छडा अजूनही पोलिसांना लावता आलेला नाही. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यावेळीही मुल्ला यांनी स्पष्ट केले होते. 

पोलिसांना दिली हुलकावणी -- उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि सिद्धार्थनगर (नवगड) या भागात ओसामा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातून युनिट एकचे एक पथक ३१ जानेवारी २०२२ रोजी पुन्हा गोरखपूरला रवाना झाले. - मात्र, त्याने हुलकावणी दिल्यामुळे या पथकाने सध्या याच भागात मुक्काम ठोकला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस