जळगाव तहसीलचा कर्मचारी ४२०० रुपयांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:34 IST2018-08-04T14:31:39+5:302018-08-04T14:34:42+5:30
जळगाव जामोद : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या लिपिकास ४२०० रुपयांची लाच घेताना रंगहात पकडण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, तहसील परिसरात घडली.

जळगाव तहसीलचा कर्मचारी ४२०० रुपयांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या लिपिकास ४२०० रुपयांची लाच घेताना रंगहात पकडण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, तहसील परिसरात घडली. या घटनेमुळे तहसील प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील एका महा ई-सेवा केंद्र चालकाकडून पुरवठा विभागाचे लिपिक मंगेश जगदाळे याने लाच मागितली होती. लाचेची रक्कम न दिल्यास महा ई-सेवा केंद्रा संदर्भातील कामकाजात अडथळा आणण्याची कायदेशीर धमकीही दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने मंगेश जगदाळे यांच्या विरोधात अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. यात मंगेश जगदाळे याला ४२०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शनिवारी दुपारी १२ वाजता घडलेल्या या घटनेमुळे तहसील परिसरात एकच खळबळ उडाली असून, तहसील कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.