शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखाची लाच घेताना प्रांताधिकाऱ्यासह लिपिक जाळ्यात, जळगाव एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:23 IST

तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिज कर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना आहे,असे असताना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार यांच्या पथकाने पकडून ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला लावण्यात आले होते.

जळगाव -  तहसीलदारांच्या पथकाने पकडलेले वाळूचे दोन ट्रक सोडण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (वय 36, रा.रामेश्ववर शासकीय निवासस्थान, सागर पार्क समोर, जळगाव) व त्यांचा लिपिक अतुल अरुण सानप (वय 32,रा. महाजन नगर, मेहरुण) या दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहात पकडले.दोघांना अटक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ही कारवाई झाली.तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिज कर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना आहे,असे असताना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार यांच्या पथकाने पकडून ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला लावण्यात आले होते. हे ट्रक सोडण्यासाठी तक्रार यांनी प्रांताधिकारी चौरे यांची गुरुवारी भेट घेतली असता लिपिक अतुल सानप यांनी प्रांताधिकारी यांच्यासमक्ष दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले.त्यानंतर तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सापळाया तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सापळा लावण्यात आला. लिपिक अतुल सानप यांच्या पंटरने सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारली असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक जी.एम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव,हवालदार अशोक आहिरे,मनोज जोशी,सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांनी केली. दरम्यान प्रांताधिकारी व लिपिक या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी