शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी; तेलंगणाच्या हद्दीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:51 IST

Drowing Case :दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व  हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली.

ठळक मुद्दे सलमान मलिक (20 वर्ष) असे त्या युवकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील गुलावटी येथील रहिवासी आहे.

अहेरी (गडचिरोली) : अहेरीपासून काही अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर फिरण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. आज त्याचा मृतदेह तेलंगणा राज्याच्या हद्दीतून शोधून काढण्यात यश आले. सलमान मलिक (20 वर्ष) असे त्या युवकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील गुलावटी येथील रहिवासी आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील पण अहेरी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे फरमान मलिक यांच्याकडे मृत सलमान हा डिझाइन कार्पेन्टर म्हणून काम करायचा. तो मालक फरमान मलिक यांचा साळा आहे.शनिवारी सुट्टी होती. त्यामुळे सलमानसह त्याच्यासोबत काम करणारे शदाब शरोब चौधरी (18) व आसिम शेफिक (18) रा.गाझियाबाद (उ.प्र.) हे तिन्ही युवक प्राणहीता नदीघाटावर फिरायला गेले. रिमझिम पावसामुळे ते युवक पुलाच्या खाली उतरले. यादरम्यान मालक फरमान यांनी फोन करून त्यांना अहेरीकडे येण्यास सांगितले. हो निघालो, असे म्हणत पाय धुण्यासाठी ते नदीच्या किनाऱ्यावर गेले. याचवेळी सलमान याचा तोल गेल्याने तो नदीत पडला. सलमानला वाचविण्यासाठी आधी शदाब व शदाबला वाचविण्यासाठी आसिम  पाण्यात गेले. शदाब व आसिम कसेबसे पाण्याच्य बाहेर निघाले पण सलमान मलिक पाण्यात वाहून गेला.

मालक फरमान यांचे फिरायला गेलेल्या युवकांशी काही मिनिटाअगोदर बोलणे झाले, पण नंतर कुठलाच संपर्क होत नसल्याने भयभीत होऊन त्यांनी नदीकडे धाव घेतली असता त्यांना ही दुर्घटना कळली. वेळीच नदीकडे धाव घेतले असता दुर्घटना कळली. घटनास्थळ तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने फरमान यांनी तेलंगणातील मानेपल्ली पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. पण त्यांना योग्य ती मदत मिळू शकली नाही. 

दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व  हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली. त्यांनी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्याम गव्हाणे व तहसीलदार ओंकार ओतारी यांना कळविले. त्यांनी ही दुर्घटना कोणाच्या सीमेत घडली याचा विचार न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण अंधार पडल्यामुळे व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्यात नावेने शोध घेणे शक्य नव्हते. रविवारी सकाळी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस