शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:19 IST

लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष बलात्कार करणा-याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली

पुणे : लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष बलात्कार करणा-याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. अक्षय गुलाबसिंग प्रजापती (वय १९, रा. पिंपळे गुरव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. १७ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१२ ते ५ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आळंदी, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग आणि पिंपळे गुरव येथे घडली. पीडित मुलीचे कुटुंब मुंढवा येथे रहायला असून ती शिक्षणासाठी मामाकडे राहत होती. प्रजापती याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर बदनामी करण्याची आणि तिला व कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी काम पहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.      पीडित मुलगी सहमतीने पळून गेली होती. तसेच तिला सर्व बाबींची समज होती, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, ती जरी सहमतीने पळून गेली असली, तरीही तिने शरीरसंबंध ठेवण्यास विरोध केला होता. असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने प्रजापतीला शिक्षा सुनावली.

टॅग्स :Puneपुणेpimpale guravपिंपळेगुरवCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कार