मुंबई - मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आज सकाळी मराठा क्रांती मोर्चानंतर केदार सूर्यवंशी यांनी सकल मराठा समाजमार्फत जेल भरो आंदोलन पुकारले होते.मात्र, या जेल भरोदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये म्हणून २६ आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ अन्वये या २६ आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आणि महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम ६९ अन्वये शांततेचा राखण्याची समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
''जेल भरो'' आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:08 IST