Jahangirpuri Violence: जो पोलिसांसोबत राहून शांततेच्या गप्पा करायचा, तोच निघाला जहांगीरपुरी हिंसाचाराचा खरा 'मास्टरमाइंड'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:53 PM2022-05-08T15:53:21+5:302022-05-08T15:56:29+5:30

Jahangirpuri Violence: क्राइम ब्रांचने हजांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी तबरेज आलम याला अटक केली आहे.

Jahangirpuri Violence: Mastermind of Jahangirpuri Violence has arrested by Delhi crime branch | Jahangirpuri Violence: जो पोलिसांसोबत राहून शांततेच्या गप्पा करायचा, तोच निघाला जहांगीरपुरी हिंसाचाराचा खरा 'मास्टरमाइंड'

Jahangirpuri Violence: जो पोलिसांसोबत राहून शांततेच्या गप्पा करायचा, तोच निघाला जहांगीरपुरी हिंसाचाराचा खरा 'मास्टरमाइंड'

googlenewsNext

Delhi Jahangirpuri Violence Case:दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तबरेज नावाच्या व्यक्तीला अटक केली. हिंसाचाराचा खरा सूत्रधार हाच तबरेज असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो पोलिस अधिकाऱ्यांसोबत फिरत असे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून तो शांततेच्या गप्पा मारायचा. या भागातील शांतता समितीमध्येही तबरेजचा सहभागी होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तबरेज हा आधी AIMIM पक्षाचा सदस्य होता. नंतर त्यांने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी तो करत होता. जगांगीरपुरीमध्ये झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारानंतर तबरेज पोलिसांसोबत राहून परिसरात शांतता आणि बंधुभाव राखण्याचे वक्तव्य करायचा. विशेष म्हणजे, तबरेजचा यापूर्वी झालेल्या दिल्ली दंगलीतही सक्रीय सहभाग असल्याचे काहींचे म्हणने आहे.

तबरेज घटनेचा मुख्य सूत्रधाराला 
परिसरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेचे नेतृत्वही तबरेजने केले होते. तबरेज खान यांनेच तिरंगा यात्रा काढण्यासाठी शांतता समितीकडे परवानगी मागितली होती. तबरेजचे उच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आली आहेत. पण, आता दिल्ली पोलिसांचे म्हणने आहे की, त्या घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची पहिली प्राथमिकता होती. पण, चौकशीत जो कुणी दोषी आढळले, त्याची गय केली जाणार नाही.

हिंसाचारात तबरेझची सक्रिय भूमिका?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीच्या दगडफेकीत तबरेजचा खूप सक्रिय सहभाग होता. दगडफेकीनंतर तबरेज पोलिसांसोबत फिरत राहिला. DCP उषा रंगराणी जहांगीरपुरी येथे पत्रकार परिषद घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो माईकवर परिसरातील पोलिस बंदोबस्त हटवण्याची विनंती करत होता. दुसर्‍या व्हिडिओ, जहांगीरपुरी पोलिस स्टेशनच्या बाहेरच आहे. अटक केलेलया आरोपींचे कुटुंबीय पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले होते. तेव्हा तबरेज एका समाजातील कुटुंबीयांना पोलिस ठाण्याच्या बाहेर भडकावत होता. 

Web Title: Jahangirpuri Violence: Mastermind of Jahangirpuri Violence has arrested by Delhi crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.