शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जगदीश वाघ प्रकरण : तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 07:08 IST

फसवणुकीच्या आरोपाखाली रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती.

डोंबिवली : फसवणुकीच्या आरोपाखाली रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी हलगर्जी केल्याने तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस नाईक हेमंत राणे, पोलीस शिपाई सचिन वानखेडे आणि गिरीश शिर्के अशी निलंबन केलेल्या पोलिसांची नावे आहेत.वाघ याने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास लघुशंका आल्याचे या तिघा पोलिसांना सांगितले. त्याला पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या शौचालयाजवळ पोलीस घेऊन गेले. यावेळी, तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत त्याने तेथून पोबारा केला. त्यानंतर, रामनगर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून वाघ याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.पोलीस ठाण्याचे शौचालय खराब झाल्याने लघुशंकेसाठी वाघ याला बाहेर काढले होते. यावेळी, पोलिसांची नजर चुकवून वाघ पळून गेल्याचे डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कोठडीच्या बाहेर दरवाजा लावण्यात येणार आहे. तसेच, वाघ याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अजून पोलीस कर्मचारी नेमल्याचेही राऊत यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.तीन दिवसांची पोलीस कोठडीपोलीस कोठडी संपल्याने वाघ याला सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, कोठडीतून पळाल्याने त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे राऊत यांनी सांगितले.तसेच, वाघ याने अन्य एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज द्यावा, असेही आवाहन राऊत यांनी केले.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र