शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपाशी ठेवलं, दिवसाला फक्त ३ चमचे पाणी; डॉक्टरची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठी कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:37 IST

आयुष्यभर लोकांचा जीव वाचवणाऱ्या ८१ वर्षीय डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांची त्यांच्याच घरातून अत्यंत दयनीय अवस्थेत सुटका करण्यात आली.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका वृद्ध महिला डॉक्टरसोबत जे काही घडलं, त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आयुष्यभर लोकांचा जीव वाचवणाऱ्या ८१ वर्षीय डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांची त्यांच्याच घरातून अत्यंत दयनीय अवस्थेत सुटका करण्यात आली. आपल्याला जेवण तर लांबच, पण पिण्यासाठी दिवसभरातून फक्त तीन चमचे पाणी दिलं जात होतं असा गंभीर आरोप डॉक्टर हेमलता यांनी केला आहे. त्यांची मौल्यवान मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी त्यांना भूक-तहानेने व्याकूळ करून मारून टाकण्याचा कट रचला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डॉक्टर हेमलता श्रीवास्तव या जबलपूरमधील एक ख्यातनाम महिला डॉक्टर आहेत. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा आधीच मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या पतीचे निधन ६ डिसेंबर रोजी झाले. पतीच्या निधनानंतर त्या जबलपूरमधील 'राइट टाउन' या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या आपल्या कोट्यवधींच्या घरात एकट्याच राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी त्यांनी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित एका परिषदेतही सहभाग घेतला होता आणि त्यावेळी त्या पूर्णपणे निरोगी होत्या.

२६ जानेवारी रोजी 'आयएमए' (IMA) जबलपूरच्या अध्यक्षा आणि त्यांच्या ज्युनियर डॉक्टर रिचा शर्मा यांना माहिती मिळाली की, डॉक्टर हेमलता यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच दरम्यान राजस्थानहून आलेली त्यांची बहीण डॉक्टर कनकलता मिश्रा आणि गायत्री परिवाराशी संबंधित काही लोक त्यांना कोठेतरी नेण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना रोखलं, तेव्हा त्यांच्यात मोठा वाद झाला. पोलिसांत तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आलं.

गंभीर बाब म्हणजे डॉक्टर हेमलता यांची प्रकृती चिंताजनक असतानाही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. "आता त्या घरीच शांतपणे मृत्यूला कवटाळतील" असं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. जेव्हा आयएमएच्या डॉक्टरांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही विरोध करण्यात आला. आपली बहीण घरीच मरेल, असं डॉक्टर कनकलता यांनी म्हटल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.

तपासातून असंही समोर आलं आहे की, डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांच्या मालमत्तेबाबत अनेक 'दानपत्र' आधीच तयार करण्यात आली आहेत. यामध्ये काही नावं शेजारील डॉक्टरांची आहेत, तर काही दानपत्रं गायत्री परिवार ट्रस्टच्या नावावर असल्याचं सांगण्यात येत आहे. आयएमए अध्यक्षा डॉक्टर रिचा शर्मा यांनी प्रशासनाच्या मदतीने डॉक्टर हेमलता यांना जबलपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केलं आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा आहे. सध्या पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor starved, denied water in property grab attempt.

Web Summary : An elderly doctor in Jabalpur was rescued after being starved and deprived of water, allegedly to seize her wealth. Family and associates are suspected of plotting to hasten her death and steal her assets through fraudulent deeds. Police are investigating.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPoliceपोलिस