शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 22:06 IST

या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती...

ठळक मुद्देखंडणी प्रकरणातील अमोल चव्हाण यांच्या कोठडीत वाढ

पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या प्रकरणात कोथरुड पोलिसांनीअटक केलेल्या अमोल चव्हाण यानेच एका महाराजाकडून याप्रकरणातील महिलेला इच्छापूर्ती कुपी आणून दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने अमोल चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. खंडणीच्या या प्रकरणात कोथरुड पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोथरुड पोलिसांनी अमोल चव्हाण याला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती. त्यात तिने बावधनचा फ्लॅट व २ कोटी रुपये मिळावेत, अशी इच्छा व्यक्त केलेली चिठ्ठी आढळून आली होती. ही इच्छापूर्ती कुपी अमोल चव्हाण याने आणून दिल्याचे तपास स्पष्ट झाले आहे.चव्हाण याने या महाराजाचे कार्यालय दाखवले असून त्या महाराजाकडे तपास सुरु आहे.

अमोल चव्हाण याने कोणाच्या सांगण्यावरुन फिर्यादीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली हे सांगत नाही. यातील फरार आरोपी रवींद्र बऱ्हाटे याच्या सांगणेवरुन आपण व इतर काम करीत असल्याचे चव्हाण कबुल करीत आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून भेटलेला नाही, असे सांगत आहे. ज्या दुचाकीवरुन त्याने फिर्यादीला धमकी दिली. ती हस्तगत करायची आहे. अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयाकडे केली़ न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी