शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयटीची छापेमारी, कोटींच्या रक्कमेसह दागिने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:05 IST

Income Tax Search Opreation : आतापर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.

मुंबई - प्राप्तिकर विभागाने (आयटी) २५ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC), एका बड्या व्यक्तीसह त्यांचे जवळचे सहकारी यांच्या कराराची अंमलबजावणी करणाऱ्या काही कंत्राटदारांवर छापा टाकून जप्तीची कारवाई केली. आतापर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान गैरव्यवहाराची अनेक कागदपत्रे, पत्रके आणि डिजिटल पुरावे आढळून आले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले पुरावे हे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती यांच्यातील जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट करत आहेत. या ३० पेक्षा अधिक स्थावर मालमत्तांची किंमत १३० कोटीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. 

या मालमत्तांमध्ये त्यांच्या नावावर, त्यांचे सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि बेकायदेशीररीत्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावे देखील सापडले आहेत. अनेक कोटींच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली पत्रके आणि फाईल्स सापडल्या आहेत आणि त्या जप्त केल्या गेल्या आहेत. ज्यांची नोंद संबंधित खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये केली गेली नाही.

कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. या कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शोध मोहिमेदरम्यान अघोषित रोख रु. २ कोटी आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाIncome Taxइन्कम टॅक्सraidधाडMumbaiमुंबई