शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीचे वार करुन इसमाचा खून, आरोपी स्वत:हून पोलिसात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 21:27 IST

साजणी येथिल सक्काणा मळा येथे नितिन कोणिरे यांची गट नंबर ११३ मध्ये २० गुंठे शेतजमीन आहे. या जमिनी मध्येच त्यांचा २ गुंठया मध्ये जनावराचा गोठा आहे

कोल्हापूर/हातकणंगले - साजणी ता. हातकणंगले येथिल सककाणा मळा येथे वीस गुंठे जमिनीच्या आर्थिक वादातून बुधवारी सकाळी ११.४० वा. कुऱ्हाडीचे सपासप वार करून मुनाफ मंदमदहुसेन सत्तारमेकर (वय ६२ रा. तिरंगा कॉलनी कबनूर) यांचा खून झाला. यातील संशयित हल्लेखोर नितिन भाऊसो कोणिरे, (वय ३० रा. म्हसोबा मंदिराजवळ साजणी) हा स्वतःहून हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे. या खूनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.              साजणी येथिल सक्काणा मळा येथे नितिन कोणिरे यांची गट नंबर ११३ मध्ये २० गुंठे शेतजमीन आहे. या जमिनी मध्येच त्यांचा २ गुंठया मध्ये जनावराचा गोठा आहे. नितिन कोणिरे यांने आपल्या शेतजमिनीवर फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम वेळेत परतफेड केली नसल्याने कर्जाच्या वसूलीसाठी फायनान्स कंपनीने या शेतजमीनीचा लिलाव करणेत आला. फायनान्स कंपनीच्या लिलावा मध्ये ही शेतजमीन पांच वर्षापूर्वी मुनाफ सत्तारमेकर यांनी फायनान्स कंपनी कडून खरेदी केली घेतली होती.              मुनाफ सत्तारमेकर यांनी खरेदी केलेल्या जमिन मध्येच नितिन कोणिरे यांचा दोन गुंठे जनावराचा गोठा होता. जनावराचा गोठा काढुन घेण्यावरून दोघामध्ये वारंवार वाद सूरु होता. या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. स्थानिक पातळीवर एक-दोन वेळा हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला होता. बुधवारी सकाळी ११.४० वा सुमारास मुनाफ सत्तारमेकर आणि  नितीन कोणिरे यांच्या मध्ये जनावराचा गोठा काढून घेण्या वरुन वाद झाला. यावेळी नितिन ने आपल्या हातातातील कुऱ्हाडीने मुनाफ सत्तारमेकर यांच्या छातीवर, खांदयावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून जागेवरच त्यांचा खून केला. आणि स्वता हातकणंगले पोलिसात हजर होवून घटनेची माहिती दिली.                  घटनेची माहिती मिळताच हातकणंगलेचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील सहकाऱ्यां सह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनांस्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना साठी हातकणंगले ग्रामिण रुग्णालयात हलविणेत आला . इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधिक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासां बाबत सूचना दिल्या. या खूनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला असून महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकुतला वागलगावे गुन्हयाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस