शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : सुधाकर शेट्टीच्या फ्लॅट,कार्यालयावर ईडीचे छापे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 08:13 IST

एकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त, सुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली असल्याचा संशय

ठळक मुद्देमृत गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमता विक्री गैर व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनाकडून (ईडी ) कारवाईचा धडाकाएकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्तसुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली असल्याचा संशय

 मुंबई मृत गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमता विक्री गैर व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनाकडून (ईडी ) कारवाईचा धडाका सुरुच असून गुरुवारी वादग्रस्त व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या आलिशान फ्लॅट व कार्यालयावर छापे मारले. रात्री उशिरापर्यंत झडतीची कारवाई सुरु होती . 

एकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपुर्ण दस्ताऐवज जप्त केला आहे .सुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली  असल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात आले . सोमवारी ईडीने याप्रकरणी डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना  अटक केली आहे .सहा महिन्यापूर्वी याबाबत मनी लाँँन्डीगचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरनात दहावर जणांना अटक केली आहे .

 दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार व मुंबई बॉम्बस्फ़ोटातील फरारी आरोपी  इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये  लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या नावाची मालमत्ता विक्रीत अनेक बडी मंडळी सहभागी आहेत.

 तपासासाठी ईडीने गुरुवारी  सुधाकर शेट्टी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे मारले. सुधाकर शेट्टी हे बांधकाम व्यावसायिक असून मुंबईत काही ठिकाणी त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. काही महिन्यांआधी त्या वाहिनीची अर्धी मालकी विकली असल्याची चर्चा होती.अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंधित बनावट कंपन्यांना २१०० कोटींचे कर्ज दिल्याच्या आरोपावरून वाधवान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. वाधवान यांच्या 'डीएचएफएल'ने मिर्चीशी संगनमताने २१०० कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचाही 'ईडी'ला संशय आहे. यामुळेच यासंबंधी मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत 'ईडी' त्याचा तपास करीत आहे. वाधवान यांच्या चौकशीनंतर शेट्टी यांच्या घरावर व कार्यालयावर छापे मारण्यात आले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबईIqbal Mirchi Caseइकबाल मिर्ची प्रकरण