शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:27 IST

Iqbal kaskar : तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे.

ठाणे : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ताबा शुक्रवारी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) ठाण्याच्या कारागृहातून घेतला. खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि तत्सम काळ्या धंद्यांतून कमावलेला पैसा हवालाद्वारे फिरवून तो देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय  ‘ईडी’ला आहे.‘एनआयए’ला (राष्ट्रीय तपास संस्था) दाऊदशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासादरम्यान काही आर्थिक गैरव्यवहारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार ईडीने मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा दाखल करुन १५ फेब्रुवारी रोजी मुंबई, तसेच ठाण्यात छापेमारी केली. यावेळी मिळालेली कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे ईडीने छोटा शकीलचा हस्तक सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट याला मुंबईच्या डोंगरी भागातून अटक केली. तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे.

ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला २०१७ साली खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून तो ठाण्याच्या तुरूंगातच आहे. इक्बालविरुद्ध जे गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये अनिस इब्राहिम आणि आणखी काही कुख्यात गुंडांचाही समावेश होता. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी मिळवलेले पुरावे ईडीने स्वत:च्या ताब्यात घेतले होते. आता मनी लाॅंड्रिंगच्या प्रकरणातही इक्बालचा सहभाग तपासण्यासाठी ईडीने त्याचा ताबा मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाला मागितला होता. त्यानुसार शुक्रवारी इक्बालचा ताबा घेण्यासाठी दोन गाड्यांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचा ताफा ठाण्याच्या कारागृहात दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार इक्बालला त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती तुरुंग अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArrestअटकMumbaiमुंबईthaneठाणेDawood Ibrahimदाऊद इब्राहिमjailतुरुंग