शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टा: निर्माता पराग संघवीने आपल्यावरील आरोप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:50 IST

आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू जलान याने चित्रपट निर्माते पराग संघवी आपले भागीदार असल्याचा दावा केला असला तरी संघवी यांनी त्याचे हे सर्व आरोप ठाणे पोलिसांनी बुधवारी केलेल्या चौकशीत फेटाळले आहेत.

ठळक मुद्देअरबाज आणि संघवी दोघेही होणार साक्षीदारनिर्माता साजीद खानला क्लीन चीटपराग संघवींची ठाणे पोलिसांनी केली चौकशी

ठाणे: सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएलवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंध तोडले असून आपण त्याच्याशी सट्टयावर कोणतीही भागीदारी केली नसल्याचा दावा चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक पराग संघवी यांनी ठाणे पोलिसांकडे बुधवारी केला.पराग संघवी हे आपले भागीदार असल्याची माहिती कुख्यात सट्टेबाज सोनू जलान याने ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या चौकशी त दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याची शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्यावरील हे आरोप फेटाळून सोनूशी गेल्या दीड वर्षापासून संबंध तोडल्याचा दावा केला.मुंबईतील जूहू येथील एका हॉटेलमध्ये पराग आणि सोनूची तीन ते चार वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणेही व्हायचे. साधारण, दीड वर्षांपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्याने सोनूला अटक केली होती. तेंव्हा सोनू एक मोठा बुकी असल्याची माहिती मिळाली. पण, त्यानंतर आपण त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्याच्याशी आपली क्रिकेटवरील जुगाराची कोणतीही भागीदारी नसल्याचा दावा संघवी यांनी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले. संघवी यांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी केली जाणार असून त्यांचे व्यवहारही तपासले जाणार आहेत. गरज पडली तर संघवींना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाईल. चित्रपट अभिनेता अरबाज खानला या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे. तसा जबाब भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ नुसार न्यायालयासमोर नोंदविला जाणार आहे. अरबाज प्रमाणेच आता संघवींचाही जबाब १६४ नुसार नोंदविला जाणार असून त्यांनाही या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे..........................निर्माता साजीद खानला क्लीन चीट?याचा चित्रपट निर्माता पराग संघवीप्रमाणेच दिग्दर्शक निर्माता साजीद खान याचेही नाव बेटींगमध्ये सोनूने पोलिसांच्या चौकशीमध्ये घेतले होते. परंतू, हा प्रकार सात वर्षांपूर्वीचा असल्यामुळे साजीद यांना चौकशीला बोलविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे प्रदीप शर्मा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस