होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 01:13 PM2018-06-02T13:13:36+5:302018-06-02T13:21:24+5:30

5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहिती अरबाजनं पोलिसांना दिली

arbaz khan has accepted his involment in IPL betting | होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली

होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली

Next

ठाणे: आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली बॉलीवूड अभिनेता अरबाज खान यानं दिली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अरबाज खानची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान आयरपीएल सामन्यांवर बेटिंग केल्याची कबुली अरबाजनं दिली. याशिवाय 5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली आहे. 

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. अटकेत असलेला बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजला आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली होती.

जलालकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. याचप्रकरणी जलालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. सोशल मीडियावर अरबाज जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाइलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसोबत आहेत. 

देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा शेवटचा सामना होता. याच सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी जलालच्या संपर्कात होते. ही माहिती त्याच्याच साथीदारांकडून मिळाल्यावर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.
 

Web Title: arbaz khan has accepted his involment in IPL betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.