शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फरार सराफा व्यावसायिकाची अंबरनाथमध्ये जमिनीत गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 04:24 IST

आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे फरार मालक अजित कोठारी यांनी अंबरनाथमध्ये जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या हाती आली आहे.

डोंबिवली : आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे फरार मालक अजित कोठारी यांनी अंबरनाथमध्ये जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या हाती आली आहे. या प्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढत असून फसवणूक झालेल्यांपैकी २८ गुंतवणूकदार आतापर्यंत पुढे आले आहेत.रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कोठारी यांच्या चारही भावांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत कोणकोणते व्यवहार केले, त्या कागदपत्रांची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. गुप्त पद्धतीने त्यांच्या सर्व नातेवाइकांवर नजर ठेवण्यात येत असून आरोपी निश्चित सापडेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.खबरी आणि पोलीसमित्रांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कोठारी फरार झाल्यापासून त्यांचे डोंबिवली रिजन्सी संकुलातील घर बंद आहे. या घरावरही नजर असून त्यांचा मोबाइल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयएमईआय नंबरवरून त्यांचे फरार होण्यापूर्वीचे लोकेशन तपासण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी नेमण्यात आलेली दोन्ही पथके सतर्क असून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. आरोपीचे कोणतेही दुबई कनेक्शन उघडझाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोठारी यांनी बदलापूर, मानपाडा, अंबरनाथ, ठाणे, मुंबई आदी भागांमध्ये व्यवहार केल्याची पोलिसांची माहिती आहे. बांधकाम क्षेत्रात त्यांनी २० टक्के, १५ टक्के भागीदारी तत्त्वावर गुंतवणूक केल्याचीही माहिती समोर येत आहे. मिळालेली कागदपत्रे आणि बँक पासबुकच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचा तपशील घेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.२७ गुंतवणूकदारांच्या तक्रारीआतापर्यंत फसवणूक झालेल्या २७ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सोमवारी या तक्रारदारांमध्ये एकाची वाढ झाली. नव्या तक्रारदारास आरोपीने ५.५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. फसवणुकीचा एकूण आकडा दोन कोटी ६५ लाख ५० हजारांवर पोहोचला असून एकूण सात कोटींची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी