शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष खटल्याबद्दल तपास अधिकारी, सरकारी वकीलांवरील कारवाईचा बडगा घट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 22:30 IST

दर ३ महिन्यांनी होणार आढावा समितीची बैठक; दोषसिद्धचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय

ठळक मुद्देखून,बलात्कार, दरोड्यासह विविध स्वरुपाच्या गुन्ह्यातील खटल्यामध्ये दोष सिद्धचे प्रमाण अत्यल्प रहात असल्याची देशभरातील परिस्थिती आहे.राज्यातील निर्दोष खटल्याच्या प्रमाण मोठे राहिले असल्याने त्याबाबत तपशिलवार आढावा घेवून कारवाई करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

जमीर काझीमुंबई - न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्या खटल्यातील तपासी अधिकारी, सरकारी अभियोक्ता यांच्यावरील कारवाईचा फास आता आणखी घट्ट होणार आहे. सरकारच्या विरोधात निकाल लागलेल्या प्रकरणातील दोषींवरील कारवाईचा आढावा आता दर तीन महिन्यांनी घेतला जाणार आहे. त्याबाबत सर्व पोलीस घटक प्रमुखांबरोबरच अभियोक्ता संचालनालयाच्या प्रमुखांना सूचना करण्यात आलील आहे.खटल्याचे तपासात, सुनावणीमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणारे पोलीसअधिकारी, सरकारी वकीलांची वेतनवाढ, पदोन्नती रोखणे, निलंबनांची कारवाई केली जाणार आहे. गुन्हे दोष सिद्धचे प्रमाण वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.खून,बलात्कार, दरोड्यासह विविध स्वरुपाच्या गुन्ह्यातील खटल्यामध्ये दोष सिद्धचे प्रमाण अत्यल्प रहात असल्याची देशभरातील परिस्थिती आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका खटल्यात २०१४ गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार त्यासंबंधी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र तरीही राज्यातील निर्दोष खटल्याच्या प्रमाण मोठे राहिले असल्याने त्याबाबत तपशिलवार आढावा घेवून कारवाई करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या विरोधात गेलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशाची तपासणी करून सदर त्यामागील नेमके कारणे काय, तपास ,आरोपपत्र व सुनावणीच्या स्तरावर कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये संबंधितावर जबाबदारी निश्चित केली जाणार असून जिल्हास्तरावर अतिरिक्त अधीक्षकांच्या तर आयुक्तालयाच्या ठिकाणी उपायुक्त (गुन्हे) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन्यात आली आहे. त्यांच्याकडून दर ३ महिन्यातून एकदा त्यासंबंधी कोणत्याही परिस्थितीत एकदा बैठक घेतली जाईल. त्यामध्ये संंबंधित कालावधीतील खटले, निकालपत्रात न्यायालयाने मारलेले शेरे आदीचे सविस्तर विवेंचन केले जाईल.* गुन्हे सिद्ध प्रमाणाबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्याची जबाबदारी पोलीस घटक प्रमुख व अभियोग संचालनालयाचे सहाय्यक संचालक यांच्यावर असणार आहे.अधिकाऱ्यांच्या बैठकीचा त्रैमासिक अहवाल हा त्यांनी आपल्या अभिप्राय व केलेल्या कार्यवाहीसह पोलीस महासंचालक व संचालनालयाच्या संचालकांना सादर करावयाचा आहे.

*पोलीस महासंचालक व संचालनालयाकडून संयुक्तपणे वार्षिक अहवाल गृह विभागाला सादर करावयाच आहे. याबाबतच्या सुचनाचे पालन न करणाऱ्या घटकप्रमुखांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसMurderखूनCrime Newsगुन्हेगारी