शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पानटपरीवर नशेच्या गोळ्या; लातूरमध्ये दोघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:28 IST

Crime News :पाेलीस पथकाचा छापा; पाच दिवसांची काेठडी

ठळक मुद्देपानटपरीमध्ये बसलेल्या जावेद रुकमोदिन शेख (२९), नसीर अल्लाउद्दीन शेख (३१ रा. चांडेश्वर ता. जि. लातूर) यांना अटक करण्यात आली.

लातूर : शहरातील औसा राेडवर असलेल्या एका पानटपरीवर विशेष पाेलीस पथकाने छापा मारला़ यावेळी दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६०० गेळ्या आणि इतर साहित्य असा २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शनिवारी पहाटेच्या सुमारास विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असात, पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, औसा राेडवर असलेल्या एका पानटपरीवर दाेघे जण झाेपेच्या, नशेच्या गाेळ्या विक्री करत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पानटपरीवर विशेष पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारला. यावेळी पानटपरीची झाडाझडती घेतली असता झाेपेच्या, नशाकारक गाेळ्या आढळून आल्या़ दरम्यान, पथकाने नशाकारक ६०० गाेळ्या आणि इतर साहित्य असा एकूण २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गाेळ्या झोपेसाठी वापरण्यात येतात. ते अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री अथवा खरेदी करता येत नाहीत. असे असतानाही पानटपरीमधून या गोळ्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले.

पानटपरीमध्ये बसलेल्या जावेद रुकमोदिन शेख (२९), नसीर अल्लाउद्दीन शेख (३१ रा. चांडेश्वर ता. जि. लातूर) यांना अटक करण्यात आली. अधिक चाैकशी केली असता,या गाेळ्या कर्नाटक राज्यामधून एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात आल्याचे सांगितले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दाेघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिसArrestअटक