यवतमाळ : दारूच्या नशेत मुलाने वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना झापरवाडी (ता. आर्णी) येथे बुधवारी घडली. महादेव बापूराव गेडाम (६०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा मारोती महादेव गेडाम (२५) याला बुधवारी अटक करण्यात आली.मारोती हा नेहमीच दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता. याच कारणावरून महादेव व मारोती या बापलेकामध्ये नेहमी खटके उडत होते. असाच प्रकार मंगळवारी रात्री झाला. वाद सुरू असतानाच मुलाने वडिलांच्या डोक्यात काठीने प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नागपूर येथे हलविण्यात आले. बुधवारी वडील महादेव गेडाम यांचा मृत्यू झाला.या घटनेची तक्रार महादेव गेडाम यांची मुलगी अनिता श्रीराम धुर्वे यांनी पारवा पोलिसात नोंदविली. यानुसार मारोती महादेव गेडाम याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरख चौधर करत आहे.
दारूच्या नशेत लेकाने वृद्ध पित्याच्या डोक्यात काठीने प्रहार करून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:37 IST
Murder Case : झापरवाडीतील घटना : आरोपी मुलाला अटक
दारूच्या नशेत लेकाने वृद्ध पित्याच्या डोक्यात काठीने प्रहार करून केली हत्या
ठळक मुद्देमहादेव बापूराव गेडाम (६०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा मारोती महादेव गेडाम (२५) याला बुधवारी अटक करण्यात आली.