शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट कॉल करून खंडणी मागणं पडलं महागात; आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 21:46 IST

यातील मुख्य मास्टरमाईंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पालिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देमहिलेला इंटरनेटद्वारे धमकी देऊन महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीची जलदगतीने माहिती घेऊन दोन आरोपींपैकी एकास अटक केली.  सूत्रधार अटक आरोपीस  इंटरनेट कॉलद्वारे सूचना देऊन फिर्यादी महिलेकडे खंडणी मागून ती स्वीकारण्यासाठी पाठविल्याचे उघड झाले आहे. 

मुंबई - इंटरनेट कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव सुफियान अब्दुल खान (२१) असं असून तो कुर्ला पश्चिम येथे येथे राहतो. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ४ च्या पथकाने याला तक्रारदार महिलेला इंटरनेटद्वारे धमकी देऊन महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीची जलदगतीने माहिती घेऊन दोन आरोपींपैकी एकास अटक केली. 

अ‍ॅण्टॉप हिल येथील महिलेला वेगवेगळ्या मोबाईल फोन क्रमांकावरून फोन करून ओळख वाढवून तसेच इंटरनेट कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या एका माथेफिरुच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने मुसक्या आवळल्या. तर यातील मुख्य मास्टरमाईंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पालिसांनी सांगितले. अटक केलेल्यामध्ये सुफियान अब्दुल हकीम खान (२१) याचा समावेश आहे. तर यातील मास्टरमाईंड संयुक्त अरब अमिरात कतार येथील आहे. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेस अनोळखी व्यक्तीने इंटरनेट कॉल करून तिच्याशी ओळख वाढवून सतत संवाद साधून त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यादरम्यान त्याने महिलेची कौटुंबिक माहिती मिळवली. त्याचबरोबर महिलेचे आक्षेपार्ह फोटो देखील मिळविले. त्यानंतर त्या अनोळखी माथेफिरुने तिच्याकडे ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास तिच्या मुलास जिवे ठार मारण्याची तसेच या महिलेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संवेदनशील प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष ४ ने  सुरू केला. गुरुवारी यातील आरोपीने पुन्हा फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर कॉल करून तिला धमकावून ३० हजार रुपये घेऊन कुर्ला रेल्वे स्टेशन येथे येण्यास सांगितले. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला आणि नमुद खंडणीची रक्कम घेण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात आरोपी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कुर्ला येथे राहणाऱ्या आरोपीकडे केलेल्या अधिक तपासात यातील मुख्य आरोपी हा संयुक्त अरब अमिरात कतार या देशात एक वर्षापासून राहत असून तेथून तो सुत्रे हलवित असल्याचे उघड झाले. यातील सूत्रधार अटक आरोपीस  इंटरनेट कॉलद्वारे सूचना देऊन फिर्यादी महिलेकडे खंडणी मागून ती स्वीकारण्यासाठी पाठविल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसExtortionखंडणीMolestationविनयभंगWomenमहिलाInternetइंटरनेट