बदलापूर - बदलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता शहराच्या चिंतेचा विषय ठरला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली. त्या वादावादीचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले. काही शिवसैनिकांनी शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या प्रकणानंतर नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला लागले होते. त्यामुळे राजकीय दरी आणखीनच वाढली होती. या वादातूनच हा हल्ला झाला आहे. दुसरीकडे या प्रकरणानंतर शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटला; शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:59 IST
शिवसैनिकांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटला; शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड
ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाला होता.काही शिवसैनिकांनी शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.