शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कमळाच्या देठाने श्वास घेत ५ तास पाण्याखाली लपला कुख्यात चोर; आरपीएफने तासाभराच्या थरारानंतर पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:46 IST

मध्य प्रदेशात एका कुख्यात गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांनी अतिशय शिताफीने पकडलं आहे.

MP Crime: एखाद्या हॉलिवूड चित्रपटात किंवा लष्करी मोहिमेत पाहायला मिळावा, असा थरार जबलपूर रेल्वे स्थानक परिसरात पाहायला मिळाला. प्रवाशांच्या बॅगा आणि दागिने लंपास करणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला चक्क तलावात उतरावे लागले. अटक टाळण्यासाठी हा चोर चक्क ५ तास शेवाळं असलेल्या तलावाच्या पाण्यात लपून बसला होता. महत्त्वाचे म्हणजे, श्वास घेण्यासाठी तो कमळाच्या पोकळ देठाचा वापर करत होता. अखेर आरपीएफने डायव्हर्सच्या मदतीने त्याला शोधून काढले.

६ एप्रिलच्या पहाटे ४:५० च्या सुमारास जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकावर आरपीएफचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, गाडी क्रमांक ११७५३ मधून एक संशयास्पद व्यक्ती उतरली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. या व्यक्तीने चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू करताच, आरोपीने जवळच्याच एका मोठ्या शेवाळलेल्या तलावात उडी मारली.

कमळाच्या देठाने श्वास अन् ५ तासांचा खेळ

तलावात उडी मारल्यानंतर तो चोर बाहेर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र, तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. तपासात असे लक्षात आले की, तो अत्यंत हुशारीने पाण्याखाली लपला होता आणि श्वास घेण्यासाठी त्याने पाण्यात असलेल्या कमळाच्या देठाचा वापर केला. ५ तास तो पाण्यात तसाच राहिला. अखेर स्थानिक पोलिसांना आणि डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. तासनतासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर आल्यावरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरपीएफने त्याला पकडले.

जुना पेपर आणि गुन्हेगाराची खरी ओळख

सुरुवातीला या आरोपीने पोलिसांना आपली खोटी ओळख सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी एका जुन्या बातमीशी त्याचा चेहरा आणि माहिती जुळवली. त्यातून त्याची खरी ओळख पटली. हरविंदर सिंग असे या कुख्यात चोरट्याचे नाव आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांत त्याच्यावर चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.

कुख्यात गुन्हेगार

हरविंदर सिंग हा प्रामुख्याने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करतो. विनातिकीट प्रवास करणे, महिला किंवा ज्येष्ठ प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची रोकड किंवा दागिने लंपास करणे, ही त्याची पद्धत आहे. पकडले जाऊ नये म्हणून तो स्वतःसोबत कोणतेही ओळखपत्र बाळगत नाही आणि वारंवार सिम कार्ड बदलत असतो. भोपाळ, इटारसी, उज्जैन, विशाखापट्टणम आणि महाराष्ट्रातील इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात वॉरंट आहेत.

'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत कारवाई

आरपीएफचे निरीक्षक राजीव खर्ब, उपनिरीक्षक अरविंद आणि कॉन्स्टेबल विनय मौर्य व आशिष यादव यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. आरोपीला आता जबलपूरच्या विशेष रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून, विविध राज्यांतील पोलीस त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious thief hides underwater for 5 hours using lotus stem.

Web Summary : A notorious thief hid in a lake for five hours, breathing through a lotus stem to evade arrest. RPF officers caught him after a dramatic search. He has dozens of cases across multiple states.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrailwayरेल्वे