शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कलर प्रिंटर, स्कॅनर... यूट्यूबवर Video पाहिला; कर्ज फेडण्यासाठी घरातच छापल्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:39 IST

गुजरातच्या राजकोटमध्ये खोट्या नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये खोट्या नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकोट शहर स्पेशल ऑपरेशन ग्रुपने रैयाधार परिसरात छापा टाकून खोट्या नोटांची फॅक्टरी चालवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने या नोटा बाजारात आणण्यापूर्वीच पोलिसांनी १०० आणि २०० रुपयांच्या ३८ खोट्या नोटा जप्त केल्या आहेत.

प्राथमिक चौकशीत आरोपीने कबूल केलं की, कर्जामुळे त्याने खोट्या नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. एसओजीच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार, रैयाधार परिसरातील एका गोशाळेच्या शेजारी असलेल्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान नैतिक अग्रावत नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. 

पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता, तिथे एक प्रिंटर-कम-स्कॅनर, कटर, पेन्सिल, ए-४ आकाराचे कोरे कागद आणि १०० रुपयांच्या दोनही बाजूने छापलेल्या १५ बनावट नोटा सापडल्या. विशेष म्हणजे या सर्व नोटांचा सिरीयल नंबर (६६३५९८) एकच होता. याशिवाय १०० रुपयांच्या एका बाजूने छापलेल्या ३४ नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीवर कर्जाचा डोंगर होता आणि तो आर्थिक विवंचनेत होता. अवघ्या आठवड्याभरापूर्वी त्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून खोट्या नोटा कशा छापायच्या याचं प्रशिक्षण घेतलं. तीन दिवसांपूर्वी त्याने दोन नोटा छापून त्या यशस्वीपणे बाजारात चालवल्या होत्या. त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर नोटा छापण्यास सुरुवात केली, पण त्या बाजारात जाण्यापूर्वीच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी अपहरण आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Rajkot man prints fake currency at home to repay loan.

Web Summary : Rajkot: A man was arrested for printing counterfeit 100 and 200 rupee notes at home after learning the process from YouTube. He aimed to repay his debts but was caught before circulating them widely. The accused has previous charges of kidnapping and rape.
टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाPoliceपोलिस