शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:35 IST

पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.

ठळक मुद्देखंडणी प्रकरणात महाराजचे नाव देखील सामील असल्याने खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली होती.महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार सलीम मेनन उर्फ महाराज याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्यापोलिसांनी अटक केली आहे. अंडरवर्ल्डमध्ये सलीम हा महाराज या नावाने ओळखला जात होता. खंडणी प्रकरणात महाराजचे नाव देखील सामील असल्याने खंडणी विरोधी पथकाच्यापोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन नुकतीच अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडी आहे. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. ३७ गुन्ह्यांच्या प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नुकत्याच एका प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराज विरोधात पोलिसांनी भा.दं.वि.  कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याअगोदर मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सोनिया मनीष अडवाणी या नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे ती देशाबाहेर पळून जात होती. तिची चौकशी केली असता त्यावेळी एजाज लकडावालासंबंधी माहिती उघडकीस आली होती. बिहार पोलिसांच्या टीमची मदत घेऊन पाटणा विमानतळावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली होती.

टॅग्स :underworldगुन्हेगारी जगतPoliceपोलिसAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकMumbaiमुंबई