शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जी ७ वर्षांनी येणार जेलबाहेर, सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:52 IST

Indrani Mukharjee : इंद्राणी मुखर्जीला तिच्या ड्रायव्हरने केलेल्या खुलाशानंतर २०१५ मध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - देशातील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. जवळपास सात वर्षांनी तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला यातून मोठा दिलासा मिळाला आहे. इंद्राणी मुखर्जी ही तिच्याच मुलीच्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. ती ६ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणीने असा युक्तिवाद केला होता की, तिचा खटला सहा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. त्यावर आता लवकर कारवाई होण्याची शक्यता नाही. इंद्राणी मुखर्जीला तिच्या ड्रायव्हरने केलेल्या खुलाशानंतर २०१५ मध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली होती.

शीना बोरा ही पहिल्या पतीची मुलगी होतीया हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला, मात्र हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की, सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केले होते. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.शीना जिवंत असल्याचा दावा केला होतागेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता आणि ती काश्मीरमध्ये आहे. या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना सांगितले होते की, तिची मुलगी जिवंत आहे आणि ती सध्या काश्मीरमध्ये आहे, तपास यंत्रणेने तिचा शोध सुरू करावा.

जवळपास दहा वर्षापूर्वी मुंबईतील हायप्रोफाईल सोसायटीत ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती, ज्यामुळे आई आणि मुलीच्या नात्यावर संशय  निर्माण झाला होता. तिच्यावर प्रेम करणारा मुलगा नात्यात तिचा सावत्र भाऊ असल्यानं आईला आपल्या मुलीची हत्या करावी लागल्याचं सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान एकामागून एक इतक्या नाट्यमय घडामोडी समोर आल्या की, हे प्रकरण एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखे बनले. शीना बोराच्या हत्येनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता की, एका आईने आपल्या मुलीची हत्या का केली?२ मे २०१२ रोजी रायगडच्या जंगलात मृतदेह सापडला होता

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र छिन्नविछिन्न मृतदेहामुळे ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तीन वर्षांपासून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते, मात्र ठोस निष्पन्न झाले नाही. २०१५ मध्ये ड्रायव्हरच्या खुलाशामुळे पोलिसांना या प्रकरणाची उकल करण्यात मदत झाली होती.

 

 

टॅग्स :Indrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय