इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. इंदूरच्या जिल्हा न्यायालयातील ई-सेवा केंद्राद्वारे ही साक्ष घेण्यात आली, ज्यात सोनमच्या दोन मैत्रिणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून इंदूर न्यायालयात हजर झाल्या.
सोहरा न्यायालयात आरोपी राज, विकास, आकाश आणि आनंद यांना हजर करण्यात आलं, तर सोनमला देखील व्हीसीद्वारे (VC) हजर करण्यात आलं होतं. साक्ष पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तरुणींनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
या संदर्भात राजा रघुवंशी याचा भाऊ विपिन रघुवंशी याने एक निवेदन जारी करून आपलं मत मांडलं. त्याने सांगितलं की, दोन्ही साक्षीदारांपैकी एकाचा जबाब आज पूर्ण झाला आहे. आता त्यांचे जबाब पूर्ण झाले असून त्या जबाबात कुठेतरी बदल झालेला आहे.
विपिन रघुवंशीचं म्हणणं आहे की, बचाव पक्षाने जबाबात काही फेरफार केले आहेत. गोविंदच्या कार्यालयात काम करणाऱ्या या मुली देखील या प्रकरणात सामील होत्या आणि त्या आज सोनमला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शंका विपिन रघुवंशी यांनी व्यक्त केली.
विपिन पुढे म्हणाला की, नेमके जबाब कोणत्या स्वरूपाचे झाले आहेत, याची माहिती त्याला मिळाली नाही, परंतु बचाव पक्षाचे जबाब बदलण्यात आले आहेत, एवढे त्यांना नक्की माहीत आहे.