शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 21:43 IST

Raja and Sonam Case: २ जून रोजी एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला तर त्याची पत्नी सोनम अद्यापही गायब आहे. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

मेघालयच्या शिलांग येथून बेपत्ता झालेल्या इंदूर येथील नवजोडपे राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्याबाबत नवा खुलासा समोर आला आहे. ज्यादिवशी हे जोडपे गायब झाले त्यादिवशी त्यांच्यासोबत अन्य ३ युवक होते. स्थानिक गाईडने तपासात ही बाब समोर आणली. २३ मे रोजी हे जोडपे बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला तर त्याची पत्नी सोनम अद्यापही गायब आहे. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

४ जण हिंदीत बोलत होते...

मावलाखियातचे गाईड अल्बर्ट पॅड यांनी सांगितले की, मी त्या जोडप्याला ३ युवकांसोबत २३ मे रोजी सकाळी १० वाजता नोंग्रायितच्या मावलाखियात येथे ३ हजाराहून अधिक पायऱ्या चढताना पाहिले होते. मी त्या जोडप्याला ओळखत होतो कारण एक दिवसाआधीच त्यांना मी नोंग्रायात येथे माझी सेवा ऑफर केली होती परंतु त्यांनी विनम्रपणे त्यास नकार दिला होता. चार पुरुष पुढे चालले होते तर महिला मागे होती. चौघेही हिंदीत बोलत होते परंतु ते काय बोलत होते हे कळले नाही, कारण मला केवळ खासी आणि इंग्रजी येते असं त्याने सांगितले.

तसेच त्या चौघांनी शिपारा होमस्टे येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी विना गाईड ते परतले. जेव्हा मी मावलाखियात इथं पोहचलो तेव्हा त्यांची स्कूटर तिथे नव्हती असा जबाब अल्बर्ट यांनी पोलिसांना दिला आहे. इंदूरच्या जोडप्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर मावलाखियातच्या पार्किंग स्थळापासून खूप लांब सोहरारिम येथे आढळली. त्याला चावी तशीच होती. या संपूर्ण घटनेत अद्याप सोनमला काहीच थांगपत्ता नाही.

CCTV फुटेज आले समोर

शिलांगमध्ये बेपत्ता झालेले सोनम आणि मृत राजा रघुवंशी यांचे २३ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जे पोलिसांनी पाहिले. साडे चार मिनिटांच्या या व्हिडिओत राजा आणि सोनम आधी स्कूटरवरून लगेज घेऊन होमस्टे ठिकाणी येतात. सोनमच्या हातात सफेद रंगाची बॅग होती. राजा स्कूटर उभी करून होम स्टेला पोहचला तर सोनम बाहेर स्कूटरजवळ उभी होती. सोनमच्या हातात मोबाईल होता जो तिने स्कूटरच्या सीटवर ठेवला. 

राजा रिसप्शनवर जात चौकशी करून बाहेर सोनमजवळ येतो. फुटेजमध्ये त्यांच्या मागे लाल रंगाची एक कार नजरेस आली. राजाने फुटपाथवरच बॅग उघडली. त्यात सोनमने लाल आणि काळ्या रंगाचे जॅकेट, लोअर काढून ठेवले. राजा आणि सोनम होमस्टेमध्ये जातात. सोनम पुन्हा पर्स स्कूटरच्या डिक्कीत ठेवते आणि एकटीच बसते. त्यानंतर स्कूटरच्या पुढे ठेवलेली बॅग घेऊन दोघे आत येतात. त्यानंतर सोनम पुन्हा एकटी बाहेर जाते आणि फोनवर बघत बघत काही पाऊले पुढे चालते. त्यानंतर पुन्हा मोबाईल पाहत स्कूटरवर येऊन बसते. मग राजा सोनम तिथून निघून जातात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी