इंदूरचे काँग्रेस नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव यादव सध्या एका अतिशय विचित्र संकटात सापडले आहेत. एका खोडसाळ व्यक्तीने किंवा सायबर गुन्हेगाराने त्यांच्या लग्नाचं एक बनावट डिजिटल निमंत्रण पत्र (Wedding Card) तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. या पत्रिकेत लग्नाची तारीख २४ फेब्रुवारी २०२६ अशी देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कार्डसोबत एक संशयास्पद लिंकदेखील पाठवली जात आहे. ही लिंक एखाद्या मोठ्या सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) भाग असावी अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदाशिव यादव यांना जेव्हा या बनावट निमंत्रणाबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला.
नेत्यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलं की, त्यांचं कोणतंही लग्न ठरलेलं नाही आणि त्यांनी असं कोणतेही कार्ड पाठवलेलं नाही. सदाशिव यादव यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की, त्यांचे मोबाईल किंवा सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आलं असावं, ज्याद्वारे ही खोटी माहिती पसरवली जात आहे.
सदाशिव यादव यांनी आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या व्यक्तींना आवाहन केलं आहे की, या निमंत्रण पत्रिकेला गांभीर्याने घेऊ नका आणि त्यासोबत आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका.
या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवली असून सायबर गुन्ह्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहेत की, हे बनावट कार्ड कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केलं आहे.
Web Summary : Congress leader receives fake wedding invitation. Warns relatives about suspicious link, potential cyber fraud. Police investigate the incident after complaint filed.
Web Summary : कांग्रेस नेता को मिला फर्जी शादी का निमंत्रण. संदिग्ध लिंक, संभावित साइबर धोखाधड़ी के बारे में रिश्तेदारों को चेतावनी. पुलिस ने शिकायत के बाद मामले की जांच शुरू की.