शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:12 IST

UP Police and ATS Action : या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते.

ठळक मुद्देशकीलच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आयईडी जप्त केले असून दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि प्रेशर कुकर देखील हस्तगत केला असल्याची माहिती दिली. 

लखनऊच्या काकोरी पोलिस स्टेशन परिसरातील दुबग्गा परिसरात उत्तर प्रदेश एटीएस गेल्या पाच तासांपासून शोधमोहीम राबवित आहे. त्यात एटीएस कमांडोचा समावेश आहे. येथे गॅरेजमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांना लपवल्याबद्दल एटीएसला इनपुट मिळाले होते. त्यानंतरच्या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी पकडले गेले आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे एडीजी प्रशांत कुमार यांनी १५ ऑगस्टच्या आसपास हे दहशतवादी लखनऊमधील गर्दीच्या जागी, बाजारपेठा आणि स्मारकं येथे मानवी बॉम्ब (सुसाईड बॉम्बर) च्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवून आणून घातपात करण्याचा कट आखला होता. तसेच शकीलच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आयईडी जप्त केले असून दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि प्रेशर कुकर देखील हस्तगत केला असल्याची माहिती दिली. 

 

एटीएसच्या ताब्यातील दहशतवादी हे अलकायदाशी निगडित  अलसार गजवाल उल हिंद या दहशतवादी संस्थेशी जोडलेले असल्याची माहिती प्रशांत कुमार यांनी दिली. मिनहाज अहमद, मासिरुद्दिन उर्फ मुशीर हे दोघे लखनऊचे राहणारे आहेत.  

या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते.याबाबत एटीएसला एका आठवड्यापासून खबर लागली होते. त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसची या घरावर नजर होती. दोन - तीन संशयित व्यक्ती या घरात ये- जा करत होते. आज छाप्यादरम्यान ६ ते ७ किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहे. या एटीएसच्या मोठ्या कारवाईदरम्यान  रायबरेली, सीतामढी आणि रायबरेलीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.   

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसUttar Pradeshउत्तर प्रदेशTerrorismदहशतवादterroristदहशतवादीArrestअटक