तलवारीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, दोघांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: May 26, 2023 18:03 IST2023-05-26T18:03:22+5:302023-05-26T18:03:43+5:30
१४ वर्षीय मुलीला अश्लील भाषेत बोलत विनयभंग

तलवारीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, दोघांवर गुन्हा
रुपेश हेळवे, सोलापूर: तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतले आहेत, ते दे म्हणत पीडित १४ वर्षीय मुलीला अश्लील भाषेत बोलत तिचा हात पकडत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीवरून नवनाथ पवार, पृथ्वीराज तानाजी पवार ( दोघे रा. सोलापूर) यांच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता ही २५ मे रोजी अंगणात थांबलेली असताना आरोपी नवनाथ पवार हा हातात तलवार घेऊन आला. त्याने पीडितेला तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतले होते, ते परत केले नाहीत असे म्हणत पीडितेला अश्लील भाषा वापरली. शिवाय तिला पकडून जबरदस्तीने ओढत नेत होता. यावेळी आरोपी पृथ्वीराज हा ही पीडितेच्या दंडाला पकडून ओढत होता, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.