शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ; ‘ईडी’चा चमू पुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:01 IST

Increased difficulty in Bhavana Gawli : धर्मदाय आयुक्त कार्यालयातील दस्तावेजांची कसून तपासणी

ठळक मुद्देयापूर्वी उत्कर्ष महिला प्रतिष्ठानअंतर्गत चालणाऱ्या पाच संस्थांना ‘ईडी’च्या चमुने भेटी दिल्या, तर ३ सप्टेंबर रोजी पुन्हा ‘ईडी’च्या तीन लोकांची चमू वाशिममध्ये दाखल झालीया आराेप-प्रत्याराेपामुळे दरराेज राजकीय घडामाेडी सुरू झाल्यात. त्या आजतागायत सुरू असून, अचानक ३० ऑगस्ट राेजी खा.भावना गवळी यांच्या ५ संस्थांची चाैकशी ईडीकडून करण्यात आली. विद्यमान खासदार गवळी यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात विविध माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केला होता.

वाशिम : गत महिन्यात ३० ऑगस्ट रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ‘ईडी’च्या पथकाने धाडी टाकल्या. त्याची जोरदार चर्चा अद्यापपर्यंत सुरू असतानाच ३ सप्टेंबर रोजी ‘ईडी’ त्रिसदस्यीय पथक पुन्हा वाशिम येथे दाखल झाले असून सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात धडक देऊन पथकाने गवळींच्या संस्थांशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान खासदार गवळी यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात विविध माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केला होता. घोटाळ्यांसंबंधीचे सर्व सबळ पुरावे आपणाकडे असून यासंबंधी ‘ईडी’कडेही तक्रार दाखल केली, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्याच्या १० दिवसानंतरच ३० ऑगस्ट रोजी ईडीच्या चमूने खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानअंतर्गत चालणाऱ्या पाच संस्थांमध्ये धाडी टाकून दस्तावेजांची तपासणी केली. हे प्रकरण तिथेच संपुष्टात येणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र चारच दिवसांत पुन्हा ईडीचे त्रीसदस्यीय पथक ३ सप्टेंबर रोजी पुन्हा वाशिम येथे दाखल झाले. पथकाने थेट धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठून महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या संस्थांशी संबंधीत दस्तावेजांची तपासणी केली. यामुळे खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राजकीय वातावरण तापले२० ऑगस्ट रोजी आधी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि नंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांनी खासदार गवळींवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला; तर भावना गवळी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत भावना गवळी यांच्या संस्थांची थेट ‘ईडी’कडून चाैकशी सुरू झाली. लागोपाठ घडत असलेल्या या घडामोडींमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयwashimवाशिम