शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:22 IST

Nupur Sharma :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे

नवी दिल्ली :  प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नुपूर शर्माला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दिल्ली पोलीस याप्रकरणी मुंबईपोलिसांना मदत करतील, अशी आशा आहे. राज्य पोलिसांचे पथक दिल्लीत उपस्थित असून ते नुपूर शर्माला ताब्यात घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुंब्रा आणि ठाण्यातही नुपूर यांच्यावर केसनुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनी समन्स बजावले होते. पोलिसांनी त्यांना 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मुंब्रा येथील मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोलकाता पोलिसांकडूनही समन्स प्राप्त झालेयाशिवाय कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स बजावले आहे. त्याला 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस अबुल सोहेल यांनी कोंटाई पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.दिल्ली पोलिसांनीही तक्रार दाखल केलीत्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने नुपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याशिवाय नवीन जिंदाल, शादाब चौहान आणि मौलाना मुफ्ती नदीम यांच्यासह नऊ जणांविरुद्ध वातावरण चिघळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईdelhiदिल्लीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील