भिवंडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; एकाच दिवसात चोरीच्या पाच घटनांची नोंद
By नितीन पंडित | Updated: December 20, 2022 18:06 IST2022-12-20T18:05:06+5:302022-12-20T18:06:37+5:30
नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; एकाच दिवसात चोरीच्या पाच घटनांची नोंद
भिवंडी: भिवंडी परिमंडळ दोनच्या कार्यकक्षेत चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून सोमवारी एकाच दिवसात घरफोडी, चोरीसह वाहन चोरीच्या एकूण पाच घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नसीब बानू अब्दुल हमीद सय्यद वय ५३ वर्ष या महिलेच्या राहत्या घरातून आरोपी ऋशान इसराइल अन्सारी उर्फ टिल्लू याने घरातून रोख रक्कम, पर्स व मोबाईलची चोरी केली. दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपा दीपक गुप्ता वय २२ वर्ष या घरामध्ये सामानाची आवरावर करत असताना परिसरात राहणारा इसम अमित निकम वय ३५ वर्ष याने घरात येऊन महिलेच्या शोकेसच्या समोरील बाजूस ठेवलेले सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून पळवून नेले. तिसऱ्या घटनेत कोन गाव पोलीस ठाण्यात ठाणे हद्दीत राहणारे सुदेश प्रकाश पांचाळ वय २५ वर्ष हे शिवसेना चौक येथे नाश्ता करण्यासाठी बसले असता त्यांचा मोबाईल अज्ञात इसमाने चोरून नेला आहे.
नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या दोन घटना घडल्या असून संजय कुमार सुरेंद्र वय २१ वर्ष रा दापोडे यांनी पारसनाथ कॉम्प्लेक्स जवळील रस्त्यावर त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने पळवून नेली. तर सलाउद्दीन मोहम्मद समीर खान वय ३३ वर्ष रा. नायगाव यांनी राहनाल गावच्या हद्दीतील सीएनजी पंप जवळ त्यांची मोटरसायकल पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.